कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझीसंत सावता माळी (जन्म:इ.स. 1250 समाधी 1295) नामदेवाच्या प्रभावळीत महत्वपूर्ण मराठी संत सावता माळी या नावातच त्यांची व्यवसायबद्ध जात लक्षात येते. साव म्हणजे शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे भानवसे रूपमाळी हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळ्याचे 25 अभंग उपलब्ध आहेत. सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळीचा जन्म वडील परसूबा व आई नांगिताबाई यांच्या पोटी झाला. आई व वडील दोघेही विठ्ठल भक्त होते. सावता हा नवसाचा मुलगा पंढरपूरजवळच्या अरणभेंडी गावी त्यांचा जन्म झाला.सावताचे लग्न भेंडे गावातील रुपा माळी भानवसे या कन्येशी झाला. ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके 1217 (12 जुलै, 1295) रोजी ते अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येते. त्यांचे अभंग कमी असले तरी त्याचा ठसा जनमानसावर उमटलेला दिसून येतो. काही अभंगातून त्याने तत्कालीन सामाजिक संदर्भाचेही दर्शन घडविले आहे. सावता माळी यांच्या अभंगात सोपेपणा, प्रासादिकता, व अल्पाक्षरत्व आढळते.
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी,
लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरि
विठ्ठल केवळ मूर्तीमधेच नाही, देवळात नाही, तर तो सर्वत्र व्यापक आहे. सावता आपल्या शेतात उगवलेल्या चैतन्य कोंभात विठ्ठलाचे गोंडस रुप पाहतो. ‘सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा’ असे शेवटी म्हणतात.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें