शनिवार, 15 फ़रवरी 2014

संत सावता मिञमंडळ ढाकेफळ
सावित्री फुले विद्यापीठ, पुणे : काही मुलभूत मुद्दे
सावित्रिमाइंचे नाव पुणे विद्यापीठाला देणे हि एक उत्तम गोष्ट आहे. शिक्षणाचि ठेकेदारी चालणार नाही. स्त्री शुद्रांसकट सर्व समाजाला शिक्षण मिळाले तर त्याला काही अर्थ आहे । ज्योतिरावांचा हा मुलभुत विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दगड जिने खाल्ले त्या - माइचे - आईचे - गाव पुणे आहे आणि त्यात तिच्याच नावाचे विद्यापीठ हि होणार आहे. हि एक चांगली गोष्ट आहे.

मुळात या मागणीला कोणीही जवाबदार व्यक्ती किंवा संघटनेने विरोध केलेला नाही. तरीही नाम विस्ताराचे झेंगट कोणि पुढे आणले ? सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हि द्विरुक्ती हास्यास्पद वाटते. त्यामुळे नाम विस्ताराची गरज नाही. सावित्री माई फुले विद्यापीठ हेच नाव योग्य आहे.

या नामांतराला ब्राह्मणांनि विरोध केलेला नाही. . . ते ठीकच . पण केवळ राजकीय अनुत्साह म्हणुन विरोध न करणे वेगळे आणि फ़ुलेंचे महत्व समजून या नामांतराला पाठिंबा देणे वेगळे. फक्तच ब्राह्मणच म्हणुनच जातीयच हिताचाच विचारच करायचाच झालाच तरच ……………. उत्तर पेशवाईत ब्राह्मण माजले होते । फुलेंनी त्यांच्याविरुद्ध तेंव्हा लिहिणे । तेंव्हा योग्यच होते। शिवाय ज्या समाजातल्या स्त्रिया शिकतात तोच समाज प्रगती करतो । सावित्रिमाइंनि ब्राहमणांसकट सर्व स्त्रियांना शिकवले आणि विधवा केशवपनासारखी दुष्ट रूढी बंद करण्यासाठी नाव्ह्यांचा संप घडवला. विधवेचे केस भादरून तिला रंडकि बनवण्याची दुष्ट रूढी ब्राह्मण समाजातच जास्त प्रचलित होती. आणि दुष्ट प्रथे पासून आपल्या स्त्रियांचे रक्षण फुले पती पत्नींनी केले …. म्हणुन ब्राह्मणांनि फ़ुलेंचे आजन्म ऋणी राहिले पाहिजे. शेवटी महात्मा फुले आणि सावित्रि आईने एका ब्राह्मण विधवेच्या परित्यक्त ब्राह्मण मुलाला - यशवंताला दत्तक घेतले आणि त्याच्या नावे आपली सर्व संपत्ति केली. फुलेंच्या ब्राह्मण विरोधकांनी हे विसरता कामा नये. ज्या समाजातल्या स्त्रिया शिकतात- सुधारतात - तोच समाज प्रगती करतो.. हे … हे ब्राह्मणांनि निदान आता तरी ओळखुन या नामांतराला पाठिंबा दिला पाहिजे .

भारतात जाती आहेत. त्यामुळे जातीय राजकारणे होणे हि स्वाभाविक आहे. पण पुणे या नावातच काहीतरी ओंगळ आहे बीभत्स आहे असे मानणारे - राजा ढाले आणि हनुमंत उपरे हे लोक - या उद्गारातून - समाजकारण, राजकारण यातले काहीही करत नाहीत. हेट इन प्लुरल चा हिटलरी गुणधर्म जागृत ठेवत आहेत . ५ - ५० वर्षाची उत्तर पेशवाई हि पुणे शहराची एकमेव ओळख नाही. रानडे , गोखले , महात्मा फुले आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी जीवाची बाजी लावणार्या दाभोलकारांच्या साधनेचे प्रमुख कार्यालयहि पुणे येथेच आहे. ढाले उपरेनि द्विरुक्ती होते म्हणुन - पुणे या शब्दाला विरोध दाखवलेला नाही . आपलि हिटलरि मानसिकता दाखवत एका आक्ख्या गावाचाच द्वेष कसा करता येतो ते दावले आहे . मुळात बिनविरोध नामांतर होत असताना स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा बालिश उद्योग आहे … कि नंतर वेगळ्या कोणा तर्फे जिजाबाइचे नाव पुढे करून मराठा विरुद्ध माळी कार्ड पुढे करत -- आर्म स्ट्रोंग भुजबळांना दाबण्याचि हि -- पवार खेळीची सुरवात आहे ? जिजामातेच्या नावाची चर्चाही काही लोकांनी उकरली होती .

मुळात नामांतर , स्मारके आणि आरक्षण हे सर्व योग्य असले तरी तेथेच अडकुन पडता येणार नाही. यापुढे जाण्याची गरज आहे .

मराठवाड्यातले नामांतर युद्ध केवळ विद्यापीठाच्या नावापुरते कधीच नव्हते . मराठवाड्यातल्या गायरान जमिनीची मालकी दलितांकडे असावी कि मराठा - कुणबी - माळी या जातिंकडे ? यावरच्या उग्र आंदोलनांचि पार्श्वभूमी त्याला होती . निजामाच्या बाजूने कोण होते आणि विरुद्ध कोण ? असा हिंदु मुस्लिम झगड्याचा आयाम हि त्याला होता . त्यावेळी समाजवादी अनंत भालेराव ते बाळासाहेब ठाकरे वगैरे सर्वच दिग्गज या लढ्यात आपापल्या पुर्वग्रहांनिशि विरोध करते झाले होते .पवारांची आणि ठाकरेंची खेळी यशस्वी झाली आणि राज्याभरातले नवबौद्ध पवारांमागे उभे राहिले तर मराठवाड्यातल्या मराठा समाजात शिवसेना फोफावली .

पुणे विद्यापीठाच्या नामांतरा मागे अशी कोणतीही वर्तमानकालीन खर्या खुर्या सामाजिक संघर्षाची पार्श्वभूमी नाही . त्यामुळे त्याला विरोध होणार नाही . आणि त्यावर कोणाला राजकीय पोळ्याहि भाजता येणार नाहीत . हा पण आपण किती मिडिया क्रेझी आहोत हे सिद्ध करण्यासाठी वेडी वाकडी विधाने अवश्य करता येतील...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें